पिंपरी / चिंचवड

महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकास अटक

पिंपरी l प्रतिनिधी

ऑफिसमध्ये काम करत असलेल्या महिलेजवळ येऊन तिच्याकडे अश्लील नजरेने पाहून अश्लील इशारे केले. याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 8) दुपारी साडेचार वाजता फॅक टेक इंजिनिअरिंग असोसिएट्स प्रा ली कंपनीच्या ट्रेडिंग ऑफिसमध्ये घडली.

याप्रकरणी पीडित महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक सुरेश तुळवे (रा. खालूंब्रे, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी फिर्यादी महिला ऑफिसमध्ये एकट्या होत्या. त्यावेळी आरोपी ऑफिसमध्ये येऊन फिर्यादी यांच्या जवळील खुर्चीवर बसला. फिर्यादी यांनी वरिष्ठ ऑफिसमध्ये नाहीत, तुम्ही बाहेर जा असे आरोपीला सांगितले. तरी देखील आरोपी बाहेर न जाता फिर्यादी यांच्याकडे पाहत बसला आणि त्याने फिर्यादी यांच्याकडे पाहून अश्लील इशारे करत त्यांचा विनयभंग केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button