पिंपरी / चिंचवड

वाकडमधून कंटेनर आणि ट्रॅक्टर चोरीला

पिंपरी l प्रतिनिधी

वाकड परिसरात दोन वाहन चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. एका घटनेत कंटेनर तर दुस-या घटनेत ट्रॅक्क्टर चोरीला गेला आहे. याप्रकरणी बुधवारी (दि. 9) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

विजय शंकर भिसे (वय 34, रा. मामुर्डी, देहूरोड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात कंटेनर चोरीप्रकरणी फिर्याद दिली आहे. रिव्हिगो सर्व्हिसेस प्रा ली या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकीचा 13 लाख रुपये किमतीचा कंटेनर अज्ञात चोरट्याने चोरून नेला. ही घटना 5 डिसेंबर 2021 ते 14 फेब्रुवारी 2022 या कालावधीत अशोकनगर ताथवडे येथे घडली.

गोविंद गेनू राठोड (वय 39, रा. दिघी) यांनी ट्रॅक्टर चोरी प्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा एक लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर अज्ञात चोरट्याने थेरगाव येथून चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 9) सकाळी साडेनऊ वाजता 16 नंबर, थेरगाव येथे घडली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button