breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपमहाराष्ट्रविदर्भ

देवेंद्र भुयारांचा विरोधकांना इशारा… राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला धक्का लावण्याचं काम केलं तर..,

अमरावती । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार देवेंद्र भुयार यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला धक्का लावण्याचं काम केलं, तर तलवारीनं हात छाटल्याशिवाय राहणार नाही, हे ध्यानात ठेवले पाहिजे, असा इशारा देवेंद्र भुयार यांनी विरोधकांना दिला आहे.

देवेंद्र भुयार हे अमरावती येथील कार्यक्रमात बोलत होते. मुंबईच्या ठाकरेंची दहशत काल होती, आज आहे आणि उद्याही राहणार आहे. तुमची दहशत नदीच्या काठापर्यंत. आमच्या नादाला लागायचं नाही. शिवाजी संस्थेच्या निवडणुकीमध्ये जाणीवपूर्वक तुम्ही धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला, तर तलवारीने हात छाटल्याशिवाय राहणार नाही, हे ध्यानात ठेवले पाहिजे, असं देवेंद्र भुयार म्हणाले.

५० गद्दार गुजरात मार्गे गुवाहाटीला गेले आणि चांगलं सरकार पडलं. अलिबाबा चाळीस चोराच्या सरकारने आमचा कोट्यवधीचा निधी रोखला आहे. काही लोकं मला जाणीवपूर्वक बदनाम करतात. मला भाजपमध्ये जायचं असलं तर तेव्हाच गेलो असतो. गुवाहाटीमध्ये आणि ५० खोके घेऊन आलो असतो. मी गुवाहाटीत गेलो असतो तर या लोकांनी शेण घातलं असतं, असंही भुयार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button