breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर अस्वस्थता; अपक्ष आमदाराने सांगितला कालचा घटनाक्रम

अमरावतीः शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली २२ ते २५ शिवसेना आमदारांनी पक्षाविरोधात बंड केल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे व हे शिवसेना आमदार सूरतमध्ये आहेत. शिवसेनेकडून या आमदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत. अशातच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा असताना अपक्ष आमदारांने महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार समर्थक अपक्ष आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान एकनाथ शिंदेंसोबत भेट झाल्याचं म्हटलं आहे. एकनाथ शिंदेंसोबत भेट झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसत होती, असं देवेंद्र भुयार यांनी म्हटलं आहे. तसंच, शिंदे भाजपसोबत जाणार नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांची काल भेट झाली असता त्यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसत होती. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणला विश्वासात घेत नाहीत. मात्र, एकनाथ शिंदे भाजपसोबत जातील असं वाटतं नाही. त्यांच्याकडून भाजपसोबत जाण्याची चूक होणार नाही, असा विश्वासही भुयार यांनी व्यक्त केला आहे.

  • अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत देवेंद्र भुयारांची प्रतिक्रिया

जितदादा हे उपमुख्यमंत्री असून ते आत्ताच महाविकास आघाडीचा प्रमुख घटक आहेत. पण उद्या अजितदादा मुख्यमंत्री झाले तर तो माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा प्रसंग असेल, अशी प्रतिक्रिया देवेंद्र भुयार यांनी दिली आहे.

  • संजय राऊतांवर निशाणा

संजय राऊत साहेबांनी आता शिवसेना पक्षात अस्तनीतील निखारे कोण आहेत, हे तपासावं. गद्दारांना माफी नाही, असे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे म्हणाले होते. विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेकडे ५५ आमदारांचे संख्याबळ असूनही त्यांना ५२ मतंच मिळाली. त्यामुळे हे तिघेजण कोण, हे राऊतांनी तपासावे. आम्ही अपक्ष आमदार पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडीसोबत आहोत आणि राहू, असेही देवेंद्र भुयार यांनी म्हटेल.

  • एकनाथ शिंदेंची फेसबुक पोस्ट

नॉट रिचेबल असलेल्या एकनाथ शिंदे यांनी काही तासांपूर्वी एक फेसबुक पोस्ट करत योगा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. योगा म्हणजे संतुलित मन, सुखी, निरोगी आणि समृद्धी जीवनाचा राजमार्ग, असं त्यांनी म्हटलं आहे. मात्री आपल्या पोस्टसोबत असलेल्या फोटोत मागे कमळाचे चित्र आहे. त्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे खरंच बंड पुकारणार का?, अशा चर्चा सध्या रंगल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button