breaking-newsपिंपरी / चिंचवड

नागरवस्तीचे तीन विभागात विभाजन होणार – एकनाथ पवार यांची माहिती

 पिंपरी – महापालिकेच्या नागरवस्ती योजना विभागामार्फत महिला व बाल कल्याण, समाज कल्याण आणि इतर विविध कल्याणकारी योजनांची सक्षमपणे वेळेत अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळत नाहीत. त्यामुळे या विभागाचे आता तीन विभागांमध्ये विभाजन करण्यात येणार आहे, अशी माहिती एकनाथ पवार यांनी दिली. 

महापाैरांच्या दालनात महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर आणि नागरवस्ती योजना विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पवार म्हणाले, “महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समिती तसेच, समाज कल्याण आणि इतर अशा विविध कल्याणकारी योजना आहेत. या योजनांचे अर्ज वाटप, छाननी, पात्र व अपात्र यादी आणि प्रत्यक्ष लाभ या संदर्भात नियोजनबद्ध वेळापत्रक तयार केले जाणार आहेत. हे वेळापत्रक 8 दिवसांमध्ये निश्‍चित करण्याचा सूचना संबंधित विभागास देण्यात आल्या आहेत.

विभागाचा कारभार अधिक सक्षमपणे होण्यासाठी महिला व बाल कल्याण, स्कील डेव्हल्पमेंट आणि दिव्यांग पेन्शन व इतर योजना असे तीन विभाग करण्यात येणार आहेत. त्याची प्रत्यक्ष कार्यवाही येत्या महिन्याभरात केली जाणार आहे. त्यामुळे त्या-त्या विभागाची सक्षमपणे अंमलबजावणी होऊन अधिकाधिक नागरिकांना त्यांचा लाभ मिळू शकणार आहे. या विभागात निवृत्त अधिकारी व स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधींची नेमणूक केली जाणार आहे. त्यामुळे मनुष्यबळाचा प्रश्‍न सुटणार आहे. सदर नव्या तीन विभागाच्या आकृतीबंधास शासनाचे मंजुरी दिल्यास त्यानुसार पदे भरली जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button