breaking-newsताज्या घडामोडी

बापरे! मंत्र्याच्या स्वागतासाठी तब्बल 251 किलोचा पुष्पहार

औरंगाबाद | महाईन्यूज

रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री व शिवसेनेचे आमदार संदिपान भुमरे हे गेल्या दोन दिवसांपासून आपल्या पैठण विधानसभा मतदारसंघच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे ठीक-ठिकाणी त्यांचे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून स्वागत करण्यात येत आहे. आज ते बिडकीन येथे आले असताना शिवसैनिकांकडून चक्क 251 किलोच्या पुष्पहाराने त्यांचे स्वागत करण्यात आले आहे.

नव्याने मंत्रीपद मिळालेले सर्वच मंत्री आपल्या मतदारसंघात मतदारांचे आभार मानण्यासाठी दौऱ्यावर असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून आपल्या नेत्यांचे मोठया थाटात स्वागत केले जात आहे. यासाठी होर्डिंग्ज, पुष्पगुच्छ आणि मोठ-मोठ्या पुष्पहारासाठी कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button