Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

पर्यटनस्थळांच्या विकासासाठी २५० कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील पर्यटनविकासाच्या प्रकल्पांचा आढावा व पर्यटनवाढीला प्रोत्साहन देण्यासंदर्भात विशेष बैठक पार पडली.राज्यातील महाबळेश्वर, एकविरा देवस्थान,लोणार सरोवर,अष्टविनायक,कोकणातील समुद्रकिनारे आदी पर्यटनस्थळांच्या विकासासाठी २५० कोटी रुपयांचा तातडीनं निधी वितरीत करण्याचे निर्देश दिले. राज्यातील पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या १० जिल्ह्यांत प्रायोगिक तत्त्वावर जिल्हा पर्यटन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

 

राज्यातील महाबळेश्वर, एकवीरा देवस्थान, लोणार सरोवर, अष्टविनायक, कोकणातील समुद्रकिनारे आदी पर्यटनस्थळांच्या विकासासाठी 250 कोटी रुपयांचा तातडीने निधी वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. राज्यातील पर्यटनदृष्ट्या महत्वाच्या दहा जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर जिल्हा पर्यटन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली. जिल्ह्यातील पर्यटन विकासात खासगी संस्थांना सहभागी करुन घेण्यासाठी जिल्ह्यांमध्ये पर्यटन सोसायटी स्थापन करण्यास प्रोत्साहन देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला.

 

जिल्ह्यांतील पर्यटन विकासात खाजगी संस्थांना सहभागी करुन घेण्यासाठी जिल्ह्यांत पर्यटन सोसायटी स्थापन करण्यास प्रोत्साहन देण्याचा निर्णय झाला. अर्थसंकल्पीय तरतूदीच्या २५ % निधी टप्प्याटप्यानं वितरित करण्यासह पर्यटन विकासाची १०० % पूर्ण कामांची ७२ कोटींची देयके अदा करण्यात यावीत. जिल्हा पर्यटन अधिकाऱ्यांची प्रायोगिक तत्त्वावर आणि कंत्राटी पद्धतीनं नियुक्ती करताना ॲग्रो टुरीझमच्या क्षेत्रात कार्यरत तज्ञांचा विचार व्हावा असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

 

राज्यातील पर्यटन विकासाच्या प्रकल्पांचा आढावा आणि पर्यटनवाढीला प्रोत्साहन देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button