breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये ‘तो’ तरुण महिनाभरापासून करतोय महिलेचा पाठलाग

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने रविवारी महिलेला शिवीगाळ करत तिच्याकडील मोबाइल हिसकावून पळ काढला. या प्रकरणी महिलेने संशयित तरुणाविरोधात पिंपरी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पिंपरी-चिंचवड परिसरात काही महिन्यांपासून गुन्हेगारी घटनांचं प्रमाण वाढलं आहे. खून, चोरी आदी घटनांमुळे या परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली आहे. येथील महिला सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. अशीच एक घटना नुकतीच घडली आहे. एक २१ वर्षांचा तरूण महिनाभरापासून महिलेचा पाठलाग करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अखेर रविवारी महिलेच्या तक्रारीवरून संबंधित तरुणाविरोधात पिंपरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या महिनाभरापासून हा तरूण महिलेचा पाठलाग करत होता. रविवारी त्याने महिलेला गाठले. तिच्याशी गैरवर्तन केले. त्यानंतर तिच्याकडील मोबाइल हिसकावून पळ काढला. महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी सांगितले की, १ जुलैपासून संशयित तरूण या महिलेचा पाठलाग करत होता. ती ज्या ठिकाणी नोकरी करत होती, त्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत तो पाठलाग करत होता. तसेच त्याने अनेकदा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. या तरुणाचा शोध घेण्यात येत आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button