breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘स्वच्छ, सुंदर कस्पटेवस्ती – वाकड’द्वारे गणेश कस्पटे यांची सामाजिक बांधिलकी

  • परिसरातील स्वच्छता अभियान मोहिमेतून जनजागृतीचा संदेश

पिंपरी । प्रतिनिधी
आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक सामाजिक कार्यकर्ते गणेश कस्पटे यांनी ‘‘स्वच्छ, सुंदर कस्पटेवस्ती- वाकड’’ हा उपक्रम हाती घेतला आहे. महात्मा गांधी जयंतीनिमित्त सुरू केलेल्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले आहे.

कस्पटेवस्ती – वाकड येथे स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने झाडांच्या वाढलेल्या फांद्या छाटून टाकण्यात आल्या. तसेच रस्त्यावरील कचरा उचलण्यात आला. बसस्टॉप परिसरात लावण्यात आलेली जाहिरात पत्रके काढून टाकण्यात आली आहेत. छत्रपती चौक, कस्पटेवस्ती, वाकड या परिसरात गांधी जयंतीनिमित्त स्वचछता अभियान राबवण्यात आले.
” एक कदम स्वच्छता की ओर भारत” असा संकल्प घेऊन “नागरिकांना ‘ स्वच्छतेतून समृध्दीकडे” असा संदेश या मोहिमेतून देण्यात आला. महात्मा गांधी जयती (२ ऑक्टोबर) ते ५ ऑक्टोबर या कालावधीत ही मोहीम राबवण्यात आली.

स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न- कस्पटे
कस्पटेवस्ती परिसरातील आपण रहिवासी आहोत. आज प्रत्येकाला स्वच्छतेचे महत्व पटलेले आहे. या अभियानाच्या माध्यमातून “आपला परिसर स्वच्छ व सुंदर करुया” असा संदेश देण्यात आला, असे सामाजिक कार्यकर्ते गणेश कस्पटे यांनी सांगितले. या मोहीमेंतर्गत झाडांच्या फांद्या व कचरा वगैरे मोफत उचलण्यात आला. त्यासाठी नागरिकांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले होते. परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button