breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

महाविकास आघाडीत बिघाडी? मावळ लोकसभेवर वंचितचा दावा

पुणे | लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. यामुळे राज्यातील सर्वच पक्ष जागांची चाचपणी आणि दावा करत आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघाला सर्वच पक्षांची पसंती आहे. शिवसेना शिंदे गटाचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पुन्हा एकदा मावळच्या उमेदवारीवर दावा केला आहे. तर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे यांना उमेदवारी मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. आता वंचितनेही मावळ लोकसभेवर दावा केला आहे.

पुण्यातील मावळ लोकसभेवर आता वंचितने दावा केला असून स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचा इशारा वंचितचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल जाधव यांनी दिला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात २०१९ ला झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये ऐनवेळी उभा केलेल्या वंचितच्या उमेदवाराला लाखभर मते मिळाली होती. हा मतदारसंघ आमच्या हक्काचा असून आम्ही यावर दावा केला आहे.

हेही वाचा     –      बारामतीत अजित पवार गटाचा उमेदवार ठरला, सुनील तटकरेंचं मोठं विधान

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत काय झालं?

२०१९ मध्ये मावळ चर्चेत राहिला कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुपुत्राने या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत फूट पडल्याच्या चर्चाही त्यावेळी झाल्या होत्या. पण अखेर श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवारांचा पराभव केला आणि हा मतदारसंघ शिवसेनेकडे राखला. या २०१९च्या लोकसभा निवडणुकीसाठी मावळमध्ये ‘स्थानिक विरुद्ध बाहेरचा’ हा मुद्दा महत्त्वाचा ठरला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाला मावळच्या मतदारांनी खासदार म्हणून पसंती दिली नाही. पार्थ पवारांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज असलेल्या राष्ट्रवादीच्या काही स्थानिक नेत्यांनी त्यावेळी घेतलेली भूमिका श्रीरंग बारणे यांच्या हिताची ठरली होती. तब्बल २ लाख ५ हजार मतांनी पार्थ पवार यांचा दणदणीत पराभव करत शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे दुसऱ्यांदा खासदार झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button