breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

बारामतीत अजित पवार गटाचा उमेदवार ठरला, सुनील तटकरेंचं मोठं विधान

पुणे | राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध अजित पवार यांच्याकडून कोणता उमेदवार दिला जाणार याची चर्चा रंगली होती. अजित पवार गटातून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे संपुर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे.

सुनील तटकरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाबद्दल अजून अंतिम निर्णय झालेला नाही. पण बारामतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली तर सुनेत्रा पवारच उमेदवार असतील. आम्ही बारामतीची जागा महायुती म्हणून लढणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना एकत्रित बसून निर्णय घेऊ. महायुतीमधून बारामतीची जागा आमच्याकडे येईल अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा      –      ‘सारथी’ संस्थेमार्फत ४७ गड-किल्यांची स्वच्छता 

महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी सर्वांच लक्ष बारामती मतदारसंघावर आहे. भाजपा, शिवसेनेला विचारात न घेता प्रदेशाध्यक्षांनी बारामतीमधून उमेदवारी जाहीर केली, असं म्हटलं जाईल. पण असं नाहीय. महायुती म्हणून आम्ही मनाने एकत्रित आहोत. आमच्यात कुठलाही संभ्रम नाही. आमचे हितचिंतक दुर्बीण घेऊन बसले आहेत. एका वाक्याचा आधार घेऊन आमच्यात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. पण असं नाहीय. महायुती म्हणून जागा वाटप ठरलं. बारामतीची जागा राष्ट्रवादीकडे आली, तर सुनेत्रा पवार उमेदवार असतील, असंही सुनील तटकरे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button