breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

Summer Skin Care | उन्हाळ्यात मुलायम आणि चमकदार त्वचेसाठी ‘या’ गोष्टी करा!

Summer Skin Care Tips | उन्हाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या जाणवतात. अशा परिस्थितीत त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे असते. ब्युटी रूटीन नीट न पाळल्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. जाणून घ्या त्या स्किन केअरच्या चुका कोणत्या, त्या दुरुस्त केल्याने आपली त्वचा मऊ आणि चमकदार राहते.

उन्हाळ्यात चेहऱ्याची काय काळजी घ्यावी :

सनस्क्रीन लावणे : उन्हाळ्यात सनस्क्रीनचा वापर केल्यास त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. सनस्क्रीनचा नियमित वापर केल्याने त्वचा निरोगी राहतेच पण अतिनील किरणांच्या प्रभावामुळे होणारे त्वचेचे नुकसान टाळता येते. बाहेर जाण्यापूर्वी ते अवश्य लावा. याशिवाय त्वचेच्या काळजीनुसार दर ३ ते ४ तासांनी लावा. याचा वापर केल्याने वृद्धत्वाची समस्याही दूर होते.

जास्त प्रमाणात पाणी पिणे : उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी पाण्याचे सेवन महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत, सौंदर्य उत्पादनांव्यतिरिक्त, त्वचेच्या काळजीसाठी हंगामी फळे आणि भाज्यांचे सेवन करणे महत्वाचे आहे. याशिवाय वेळोवेळी पाणी जरूर प्या. हे तुमच्या शरीराला उष्माघाताच्या धोक्यापासूनही वाचवते. उन्हाळ्यात वारंवार घाम येत असल्याने शरीरात डिहायड्रेशन होण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत, इलेक्ट्रोलाइट समृद्ध पेये घेणे आवश्यक आहे. ते त्वचेची चमक देखील राखतात.

मेकअप काढायला विसरू नका : झोपण्यापूर्वी मेकअप व्यवस्थित काढला नाही तर त्वचेला इजा होण्याची शक्यता असते. छिद्रांचा आकार वाढू लागतो आणि मुरुमांची समस्या सुरू होते. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करणे आणि टोनिंग करणे खूप महत्वाचे आहे. याशिवाय चेहऱ्यावर जड मेकअप करणे टाळा. मेकअप करण्यापूर्वी त्वचेचा प्रकार तपासणे देखील आवश्यक आहे.

हेही वाचा     –    महाविकास आघाडीत बिघाडी? मावळ लोकसभेवर वंचितचा दावा 

केमिकलयुक्त उत्पादने वापरू नका : अनेक वेळा आपण घटकांची तपासणी न करता रसायनयुक्त उत्पादने वापरतो. या उत्पादनांच्या सततच्या वापरामुळे त्वचेला मोठी हानी होते. त्याऐवजी नैसर्गिक पर्यायांचा वापर करावा.

सीरम महत्त्वाचे : तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात अँटीऑक्सिडंटने समृद्ध असलेले सीरम त्वचेवर लावावे.यामुळे तुमच्या त्वचेचे प्रदूषण आणि रसायनांपासून संरक्षण होते. टोनर लावल्यानंतर आणि मॉइश्चरायझर लावण्यापूर्वी सीरमचा वापर नेहमी करावा. तसेच सूर्याच्या हानिकारक किरणांपासून तुमचे रक्षण होते. तसेच जर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही अँटी एजिंग सीरमचा उपयोग करू शकता.

फळांचे सेवन करा : शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवण्यासाठी तुम्ही द्राक्षे, टरबूज, आंबा, संत्री यासारख्या हंगामी फळांचे सेवन करू शकता. या हंगामी फळांमध्ये भरपूर पाणी असते. त्यामुळे त्वचेची चमक कायम राहते. तसेच दररोज सकाळी फळांचे सेवन करावे.

थंड पाण्याने चेहरा धुवा : उन्हाळ्यात, बाहेरून घरी आल्यानंतर किंवा जेव्हाही गरज वाटेल तेव्हा थंड पाण्याने चेहरा धुवा. तसेच आठवड्यातून किमान दोनदा चेहरा स्क्रब करा. यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली धूळ, घाम आणि प्रदूषण दूर होऊन चेहऱ्याची चमक कायम राहते.

हिरव्या भाज्यांचे सेवन करा : उन्हाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाव्यात. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. याशिवाय शरीराला आवश्यक ती सर्व पोषकतत्त्वे मिळतात. त्यामुळे त्वचा चमकदार राहते.

बेसन आणि दही पॅक : या दोन्ही घटकांमध्ये ऑक्सिडंट्स असतात जे त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी आणि चमकदार बनवण्यासाठी प्रभावी मानले जातात. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही यापासून बनवलेला पॅक तुमच्या चेहऱ्याच्या आणि हातांच्या त्वचेवर १५ दिवसांत तीन वेळा लावू शकता. यासाठी एका भांड्यात ४ ते ५ चमचे बेसन घ्या आणि त्यात तीन चमचे दही घाला. तुम्ही त्यात मधही मिसळू शकता. ही पेस्ट चेहऱ्यावर सुकल्यावर थंड पाण्याने काढून टाका.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button