breaking-newsराष्ट्रिय

मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी रॉबर्ट वड्रा ईडीसमोर हजर, प्रियंका गांधींनी दिली सोबत

आर्थिक अफरातफर केल्याप्रकरणी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा सक्तवसुली संचलनालयासमोर (ईडी) हजर झाले. यावेळी त्यांची पत्नी आणि काँग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियंका गांधी त्यांच्यासोबत होत्या. रॉबर्ट वड्रा यांना सक्तवसुली संचलनाल कार्यालयात सोडून प्रियंका गांधी परतल्या.

पटियाळा न्यायालयाने आर्थिक अफरातफर केल्याप्रकरणी रॉबर्ट वड्रा यांना १६ फेब्रुवारीपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. रॉबर्ट वड्रा यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. जामिनाबरोबर वड्रा यांना न्यायालयात एक लाख रुपये भरावे लागणार असून त्यांना ६ फेब्रुवारीला चार वाजता कोर्टात हजर रहाण्यास सांगण्यात आलं आहे.

View image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Delhi: Robert Vadra inside the Enforcement Directorate office, to appear in connection with a money laundering case

545 people are talking about this

सुनावणीदरम्यान ईडीने वड्रा यांची परदेशातही संपत्ती असून त्यासाठी त्यांची चौकशी करणं गरजेचं असल्याचं सांगितलं होतं. स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. या वढेरा यांच्याशी संबंधित कंपनीने २००८ मध्ये ओंकारेश्वर प्रॉपर्टीजकडून ३.५ एकर जमीन ७.५० कोटी रुपयांना खरेदी केली. त्यानंतर स्कायलाइटने डीएलएफला हीच जमीन ५८ कोटी रुपयांना विकली आणि ५०९ कोटी रुपये नफा कमाविला, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.

Embedded video

ANI

@ANI

Robert Vadra accompanied by Priyanka Gandhi Vadra arrived at the Enforcement Directorate office to appear in connection with a money laundering case. Priyanka Gandhi Vadra left soon after.

61 people are talking about this

त्या वेळी काँग्रेसचे नेते हुडा हे मुख्यमंत्री होते. वढेरा यांनी यापूर्वीच या आरोपांचे खंडन केले आहे. त्या बदल्यामध्ये राज्य सरकारने नियमांचे उल्लंघन करून डीएलएफला ३५० एकर जागा मंजूर केली, असा पोलिसांचा दावा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button