breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#Lockdown: टाळेबंदीविरोधी निदर्शनांना ट्रम्प यांचा पाठिंबा!

जगात करोनाबळींची संख्या दीड लाखांच्या पुढे गेली असून त्यातील एकचतुर्थाश अमेरिकेतील आहेत. दरम्यान अमेरिकेत टाळेबंदीच्या आदेशांविरोधात काही ठिकाणी निदर्शने सुरू झाली असून त्याला अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच पाठिंबा दिला आहे.

सामाजिक अंतरामुळे करोनाचा प्रसार कमी झाला असून जगातील ४.५ अब्ज लोक घरात आहेत. जगभरातील सरकारांनी संचारबंदी व टाळेबंदीचा अवलंब केला, पण आता हे निर्बंध शिथिल करणे सोपे नाही त्यामुळे ते चाचपडत आहेत.

अमेरिकेतील तीन राज्यांत लोक या आठवडय़ात एकत्र जमले व त्यांनी निर्बंध उठवण्याची मागणी केली. मिशिगन येथे तीन हजार लोकांनी निदर्शने केली त्यापैकी काहींनी शस्त्रेही बाळगली होती. ट्रम्प यांनी संचारबंदी किंवा टाळेबंदी शिथिल करण्याचा निर्णय आता राज्य सरकारांवर सोपवला असून केवळ मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. अमेरिकेत ७ लाखांहून अधिक लोकांना करोनाचा संसर्ग असून ३२ हजारांवर बळी गेले आहेत. दुसऱ्या कुठल्याही देशात एवढे बळी गेले नाहीत.

अनेक देशांनी बळींची मोजदाद योग्य प्रकारे केली नसून खरे आकडे वेगळे आहेत. नायजेरियात अध्यक्ष महंमदु बुहारी यांच्या वरिष्ठ सहकाऱ्याचा शनिवारी करोनाने मृत्यू झाला. चीनने त्यांचा मृतांचा आकडा सुधारित केला असून तो आता ४६३६ झाला आहे. स्वित्झर्लंड, डेन्मार्क, फिनलंडमध्ये आता दुकाने व शाळा पुन्हा सुरू होत आहेत. जर्मनीत ४३५२ बळी गेले असून तेथेही काही निर्बंध उठवण्यात येणार आहेत. काही छोटी दुकाने सोमवारपासून चालू होतील. काही आठवडय़ांत मुले शाळेतच जातील. इटलीतही निर्बंध उठवण्यात येत असून काही लोक व्हेनिसमध्ये फिरू लागले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button