ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

‘स्कूल बसच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा’; दीपक मोढवे-पाटील

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना मागणी

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडसह राज्यातील शहरांमध्ये स्कूल बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या स्कूल बसबाबत शासनाने कठोर कारवाईची भूमिका घ्यावी, अशी मागणी भाजपाचे माजी शहर उपाध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांनी केली आहे.

याबाबत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला निवेदन पाठवले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील स्कूल बसचालक सर्रासपणे नियमांना डावलूून बस चालवत आहेत. अनेक बस चालकांनी बसचे योग्यता प्रमाणपत्र घेतलेले नाही. जून महिन्यात सर्व शाळा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे सर्व शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांनी त्यांच्या वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राची तपासणी करुन घेणे गरजेचे आहे. ‘आरटीओ’कडून तसे आवाहन करूनही त्याकडे दुर्लक्ष केले केल्याचे दिसत आहे.

हेही वाचा – ‘मी पुन्हा येईन’वरून शरद पवारांचा फडणवीसांना टोला; म्हणाले..

स्कूल बस नियमावलीमधील विद्यार्थी व वाहनाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्‍यक असणाऱ्या बाबींची पूर्तता करणे आवश्‍यक आहे. स्पीड गव्हर्नर, वैध योग्यता प्रमाणपत्र, वैध विमा प्रमाणपत्र, वाहनामध्ये परिचारक असणे, अग्निशमन यंत्रणा असणे इत्यादी बाबींचा त्यामध्ये समावेश आहे. स्कूल बस नियमावलीची पूर्तता करीत असल्याची व शालेय विद्यार्थी वाहतुकीचा परवाना असल्याची खातरजमा करून वाहन मालकांनी विद्यार्थ्यांची वाहतूक करणे आवश्‍यक आहे.

या बरोबरच एका स्कूल बसमध्ये किती विद्यार्थी बसवावेत या बाबत देखील शासकीय नियमावली जाहीर करण्यात आली आहे. तरी देखील त्याकडे पिंपरी-चिंचवडसह राज्यातील सर्वच शहरांत दुर्लक्ष होताना दिसत आहे. नुकतेच एका स्कूल बसमध्ये तब्बल 92 विद्यार्थी बसवून चुकीच्या पद्धतीने प्रवास केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. विद्यार्थ्यांचा जीव धोक्‍यात घालून बस चालक-मालक प्रवास का करतात? असा प्रश्‍न आहे. एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असाही प्रश्‍नही दीपक मोढवे-पाटील यांनी उपस्थित केला आहे.

ज्या बस चालक-मालकांनी योग्यता प्रमाणपत्र घेतलेले नाही. त्यांना प्रवास करण्याची परवानगी देऊ नये. तसेच अवैधरित्या नियमबाह्यपणे अधिक विद्यार्थ्यांना एका बसमध्ये बसवून प्रवास केल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाबाबत पालकांमध्ये चिंता असून, याबाबत प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे अपेक्षी आहे.

दीपक मोढवे-पाटील, माजी शहर उपाध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button