breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

व्हॅलेंटाईन्स डे निमित्त हे जुने चित्रपट पुन्हा चित्रपटगृहात पाहता येणार!

Valentine Day | सध्या सगळीचे व्हॅलेंटाईन वीक सुरु आहे. त्याच निमित्ताने प्रेक्षकांना देखील मनोरंजनाच्या प्रेमाची पर्वणी मिळणार आहे. कारण व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी बॉलीवूडमधील गाजलेले जुने रोमँटीक चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

आजपासून म्हणजेच ९ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत हा फिल्मफेस्टिवल असणार आहे. मुंबई, दिल्ली, पुणे, गोवा, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता, हैदराबाद, कोची, लखनऊ, जयपुर, इंदौर अशा शहरांमध्ये या फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. या चित्रपटांचा तिकीट दर हा ११२ रुपयांपासून सुरु होणार आहे.

हेही वाचा     –      रेल्वेत कोणत्या वयोगटातील मुले करू शकतात मोफत प्रवास, जाणून घ्या नियम 

हे चित्रपट पुन्हा पाहता येणार चित्रपटागृहात :

या चित्रपटांच्या यादीमध्ये ‘टायटॅनिक’, ‘जब वी मेट’, ‘प्यार का पंचनामा’, ‘मोहब्बते’, ‘ये जवानी है दीवानी’, ‘वीर-झारा’, ‘सीतारामन’, ‘प्रेमम’, ‘विन्नैथांडी वरुवाया’, ‘सप्त सागरदाचे एलो-साइड ए एंड साइड’ आणि ‘दिल दिया गल्ला’ या चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या चित्रपटांसोबत एकूण २६ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button