breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदेश-विदेश

‘ISROवर होतात दररोज शेकडो सायबर हल्ले’; एस. सोमनाथ यांची माहिती

नवी दिल्ली : चंद्रयान-३ च्या यशानंतर जगभरात इस्रोची जोरदार चर्चा होत आहे. इस्रोला यशाबरोबरच नवीन आव्हानांनाही तोंड द्यावं लागत आहे. आपल्या नियमित कामासोबतच इस्रो एका वेगळ्या आघाडीवर अज्ञात शत्रूंविरुद्धही लढत आहे. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी याबाबत माहिती दिली.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था प्रमुख म्हणाले की, देशाच्या अंतराळ संस्थेला दररोज १०० हून अधिक सायबर हल्ल्यांना सामोरे जावे लागत आहे. ISRO प्रमुख दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय सायबर कॉन्फरन्सच्या १६ व्या आवृत्तीत भाग घेण्यासाठी केरळमधील कोची येथे आले होते.

हेही वाचा – नवरात्रीत होणार रखडलेल्या मंत्रिमंडळाची स्थापना? कोणत्या पक्षाला किती मिळणार मंत्रिपदं

एका वृत्तसंस्थेशी बोलताना सोमनाथ म्हणाले की, इस्रोच नाही तर इतर अनेक यंत्रणांना शेकडो सायबर प्रयत्नांचा सामना करावा लागतो. परंतु असे प्रयत्न आमच्या अनेक सुरक्षा उपायांद्वारे रोखले जातात.

सायबर प्रयत्न सुरक्षा व्यवस्थेत घुसण्यात यशस्वी झाला तरच हल्ला होतो. मात्र असं झालेलं नाही. अशा प्रयत्नांना तोंड देण्यासाठी इस्रोकडे मजबूत सुरक्षा नेटवर्क आहे. आमच्याकडे अनेक फायरवॉल आणि सुरक्षा यंत्रणा आहेत, असं सोमनाथ म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button