breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदी खोऱ्यात जसंपदामंत्री जयंत पाटील यांची पाहणी

सांगली | प्रतिनिधी

सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीतील पाणी पातळी वाढत आहे त्या पार्श्वभूमीवर कोयना धरणाची पाहणी केली. कोयना धरणात सद्यस्थितीला ९२.१७ टीएमसी पाणीसाठा आहे. धरणातून ५६००० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. आजपर्यंत महाबळेश्वर व नवजा येथे अनुक्रमे ५६०० व ६२०० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

गतवर्षी आजमितीस या भागात ७३०० व ८३०० मिमी इतका पाऊस झाला होता. सध्याचे नदीपात्रात सोडलेले पाणी हे म्हैसाळ व टेंभु योजनेतून दुष्काळी भागात दिले जात आहे. नुकसान टाळण्यासाठी टप्प्याटप्प्याने पाणी सोडणे आवश्यक आहे. अचानक पाऊस वाढला तर पाणी साठविणे अशक्य होईल. संभाव्य धोका टाळण्यासाठी सर्व प्रयत्न आम्ही करीत आहोत.

यावेळी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, मा. सत्यजित पाटणकर, मुख्य अभियंता हणमंत गुणाले, कार्यकारी अभियंता कुमार पाटील, कार्यकारी अभियंता राजन रेडीयार आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button