breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

नियमांचे उल्लंघन भोवले, युनियन बँकेला १ कोटी दंड!

मुंबई – थकबाकीदार कंपन्यांची जप्त केलेली संपत्ती आणि तिच्या विक्री व गैरव्यवहारासंदर्भात कायद्याचे पालन न केल्याने रिझर्व्ह बँकेने युनियन बँक ऑफ इंडियाला १ कोटींचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने केलेल्या तपासणीत या बँकेने लाल श्रेणीतील कंपनीबाबतच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले. त्यामुळे युनियन बँकेवर ही कारवाई केली आहे.

२०१९ मधील युनियन बँकेच्या व्यवहारांची आरबीआयने तपासणी केली. त्यात या बँकेने रेड श्रेणीतील कंपन्यांबाबतच्या नियमांचे उल्लंघन केले असल्याचे आढळले. याबाबत आरबीआयने बँकेला कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. या नोटिशीला बँकेकडून मिळालेल्या उत्तराने समाधान झाले नाही, त्यामुळे आरबीआयने युनियन बँकेला १ कोटींचा दंड ठोठावला. सोमवारच्या या कारवाईनंतर युनियन बँकेचा शेअर १.६ टक्‍क्‍यांनी घसरला आणि ४३ रुपयांवर बंद झाला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button