breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

रोटरी क्लब ऑफ निगडीच्या वतीने लॉकडाऊन दरम्यान गरजूंना दररोज अन्नदान

पिंपरी |

रोटरी क्लब ऑफ निगडीच्या वतीने लॉकडाऊनच्या दरम्यान शहरात विविध ठिकाणी गरीब, बेघर व गरजूंना अन्नदान करण्यात आले. जेवणाचे डबे व पाणी बाटल्याचे वाटप करण्यात येत आहे. दररोज सुमारे दोनशे जेवणाचे डबे वाटप करीत आहेत. हा उपक्रम लॉकडाऊन संपेपर्यंत सुरू राहणार आहे.

शगुन चौक, साई चौक, पिंपरी पुलाखाली, काळेवाडी, निगडी या ठिकाणी व सर्व पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे स्टेशन, औंध, या परिसरात वाटप करण्यात आले. रोटरी क्लब निगडीचे अध्यक्ष डॉ. प्रविण घाणेगावकर, नियोजित अध्यक्ष जगमोहन भूर्जी, शेखर झिलपेलवार, वास्तू विशारद उषा रंगराजन, संदीप मुनोत, रमेश राव, हरदीप कौर, राकेश सिंघानिया मुकुंद मुळे यांनी विशेष परिश्रम घेतले. क्लबच्या वतीने दररोज ज्या लोकांना अन्न पाणी मिळत नाही, जे काही रस्त्यावरती भटकत असतात तसेच पोलीस बांधव असतील यांना सुद्धा दररोज जेवण व पाणी बॉटल स्वतःच्या कार मधून रस्त्यावरती चौकाचौकात शोध काढून गरजू लोकांना देत आहेत.

वाचा- …अखेर महावितरण प्रशासनाला जाग; केबलचे काम सुरू!

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button