breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड ‘स्मार्ट सिटी’ कंपनीचा ‘त्या’ अधिका-यांने दिला राजीनामा?

  • काही लोकप्रतिनिधीकडून संबंधित अधिका-यास मानसिक त्रास दिल्याची चर्चा
  • संबंधित अधिका-याने दिलेल्या पत्राचा प्रशासनाकडून दुजोरा

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या उच्च पदाचा महानगरपालिकेतील एका वरिष्ठ अधिका-यांने राजीनामा दिला आहे. स्मार्ट सिटी कंपनीचे चेअरमन नितीन करीर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयुक्त राजेश पाटील यांचेकडे सोपविला आहे. याबाबत संबंधित अधिका-याने दिलेल्या पत्राविषयी प्रशासनाने दुजोरा दिला आहे. दरम्यान, संबंधित अधिका-यांस काही लोकप्रतिनिधी नाहक मानसिक त्रास देवू लागल्याने त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे.

स्मार्ट सिटी मिशन हा भारत सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. स्थानिक पातळीवरील विकास, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांच्या माध्यमातून आर्थिक विकास आणि नागरिकांचे जीवनमान उंचावून नागरिकांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देणे, हेच या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. स्मार्ट सिटी मिशनमध्ये केंद्र शासनाकडून मिळालेल्या निधीचा वापर करून ‘स्मार्ट’ परिसर आधारित विकास (एरिया बेस्ड डेव्हलपमेंट) प्रकल्प आणि पॅन सिटी प्रकल्प राबविण्यात येत आहेत.

पिंपरी चिंचवड हे शहर भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाने स्मार्ट सिटी मिशनच्या अंतर्गत निवडलेल्या १०० शहरांपैकी एक आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड या स्पेशल पर्पज व्हेईकलची स्थापना करण्यात आली आहे. सदरील प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी एक प्राधिकरण (एसपीव्ही) स्थापन करण्यात आले आहे. सदर एसपीव्हीला केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक संस्था यांच्याकढून निधी मिळत आहे. पाच वर्षांमध्ये केंद्र शासनाकडून अनुदानाचे करोडो रूपये मिळत आहेत.

त्यानूसार स्मार्ट सिटी कंपनीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महापालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण हे पॅन सिटी प्रकल्पाचे प्रमुख म्हणून गेली तीन वर्ष झाले कामकाज पाहात आहेत. मात्र, मागील कित्येक दिवस झाले त्यांना विविध कामात अडथळा आणून काहीजण नाहक त्रास देत आहेत. याबाबत अनेकदा ते खासगीत देखील बोलत होते. त्यामुळे मला स्मार्ट सिटीच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरुन कार्यमुक्त करावं, असं पत्र चेअरमन आणि मुख्य कार्यकारी अधिका-यांना दिलं आहे. या पत्रा विषयी महापालिका प्रशासन विभागाने दुजोरा दिला आहे. तसेच त्यांनी सीईओकडे काही लोकप्रतिनिधी व नगरसेवकांविषयी खाजगीत तक्रार केल्याचे बोलले जात आहे. यावर महापालिका प्रशासनाने सदरील पत्र आयुक्तांकडे टपालाद्वारे ठेवले असून त्यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही.

दरम्यान, स्मार्ट सिटी कंपनीच्या पॅन सिटी प्रकल्पातील टेक महिंद्रा संस्थेचा सर्व्हर हॅक होवून काही डाटा लीक होणे, सुमारे पाच कोटीचा डाटा चोरीला गेल्याची तक्रार निगडी पोलिसात दाखल केली होती. त्यावरुन अनेक लोकप्रतिनिधींनी संबंधित अधिका-यास नाहक त्रास दिला होता. त्या कंपनीच्या ठेकेदाराला आमच्याकडे पाठवून दे, असंही बोलले जात होते. त्यावरुन संबंधित अधिकारी मानसिक तणावात गेल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु होती.

केंद्रीय पातळीवरील एका आयटी फॅशन डिझाईन संस्थेच्या संचालक पदावर प्रतिनियुक्तीने नेमणूक करण्याविषयी जाहिरात निघाली आहे. त्यासाठी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरुन कार्यमुक्त करावं, तसेच अर्ज सादर करण्यास परवानगी द्यावी, असं पत्र स्मार्ट सिटीचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केले आहे.

निळकंठ पोमण –

सह मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी प्रकल्प

मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button