पिंपरी / चिंचवड

प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत म्हणून तरुणाच्या अंगावर घातली रिक्षा : खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

एका रिक्षा चालकाने तरुणाला खूप प्रश्न विचारले. त्यामुळे तरुण उत्तरे देण्याचे टाळून पुढे गेला. याचा राग आल्याने रिक्षा चालकाने तरुणाच्या अंगावर रिक्षा घालून खुनाचा प्रयत्न केला. तरुणाच्या पाठीचा मणका मोडला असून डावा हात फ्रॅक्चर झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 11) रात्री दत्तनगर डुडुळगाव मोशी येथे घडली.

आदित्य अंकुश बोराटे (वय 21, रा. डुडुळगाव मोशी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिहाज गफूर शेख (वय 29, रा. डुडुळगाव मोशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी बोराटे शुक्रवारी रात्री पायी चालत घरी जात होते. त्यावेळी आरोपी शेख याने ‘मी या जागेचा मालक आहे’ असे म्हणून बोराटे यांना  विचारले. त्याच्या प्रश्नांची उत्तरे देणे टाळून बोराटे तिथून निघून गेले. याचा राग आल्याने शेख याने त्याची रिक्षा भरधाव वेगात चालवून बोराटे यांना पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये बोराटे यांच्या पाठीचा मणका मोडला तसेच डावा हात फ्रॅक्चर झाला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button