breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

भाजपा नेते किरीट सोमय्या पोलिसांच्या ताब्यात

मुंबई – भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घाटकोपरमध्ये गटारात पडून महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी ते आंदोलन करत होते. यावेळी पोलिसांसोबत त्यांची बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून घाटकोपर पोलीस ठाण्यात नेले आहे. दरम्यान, महिलेच्या मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्या दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

काय आहे प्रकरण
घाटकोपरमधील असल्फा गावात राहणाऱ्या शीतल (३२) गिरणीवर पीठ आणण्यासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. मात्र एक तास होऊनही त्या घरी न परतल्याने त्यांच्या घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. त्याच सुमारास मुसळधार पाऊस झाल्याने शीतल नाल्यात पडल्या आणि त्यांचा मृत्यू झाला असे सांगितले जात आहे. हाजीअलीजवळ त्यांचा मृतदेह आढळला असून पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी ट्विट करत आज दुपारी १२ वाजता घाटकोपरमध्ये चिराग नगर पोलीस स्टेशनबाहेर महिलेच्या कुटुंबासोबत ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती दिली होती. या प्रकरणात पोलिसांनी १२ दिवसांनंतर अद्यापही एफआयआर दाखल केला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच महिलेच्या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button