ताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘पिंजरा’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे मुंबईत निधन

मुंबई |  मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री ‘पिंजरा’ फेम वत्सला देशमुख यांचे काल मुंबईत निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने कला जगतातील आणखी एक तारा निखळला. मराठी चित्रपटसृष्टीतील चतुरस्त्र अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या त्या मातोश्री होत्या.

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांनी पिंजरा चित्रपटात केलेली अक्काची भूमिका अजरामर झाली. या भूमिकेतील वत्सला यांच्या तोंडी असलेले संवाद सिनेरसिकांच्या मनावर आजही ठसलेले आहेत. या चित्रपटात त्या आपल्या छोट्या भगिनी दिवंगत अभिनेत्री संध्या यांच्यासोबत काम करत होत्या. जल बिन मछली, नृत्य बिन बिजली, नवरंग आया तुफान अशा हिंदी चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाद्वारे ठसा उमटवला, तर पिंजरा, बाळा गाऊ कशी अंगाई या मराठी चित्रपटांतून त्यांनी केलेल्या भूमिका चांगल्याच गाजल्या. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीतील आणखी एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button