breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

#COVID19: दिवे-पणत्या लावा…पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा नादान-बालिशपणा…मूर्खपणा; राष्ट्रावादीचे मंत्री जितेंद्र आव्‍हाड यांचा घणाघात (व्‍हीडिओ)

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी

देशातील नागरिकांचे कोरोनामुळे जीवन अंध:कारमय झाले असताना ठोस उपाययोजना करण्याऐजवी दिवे…पणत्या आणि मोबाईलचे टॉर्च लावण्याचा ‘इव्‍हेंट’ सूचतोच कसा? पंतप्रधान नरेंद्र मोदी याचा हा ‘इव्‍हेंट’ म्हणजे नादानपणा…आणि तद्दन मूर्खपणा आहे, असा घणाघात राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्‍हाड यांनी केला आहे.

कोरोना विषाणुच्या पार्श्वभूवीर संपूर्ण देश संकटात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सकाळी देशवासीयांशी संवाद साधला. यापूर्वी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोदी यांनी देशातील नागरिकांना थाळी, घंटा आणि टाळ्या वाजवण्याचे आवाहन केले होते. त्यावरुन देशभरातून मोदींवर टीका झाली होती.

          दरम्यान, गुरुवारी पंतप्रधान मोदी यांनी देशातील नागरिकांनी संबोधित केले. त्यामध्ये नागरिकांनी एकात्मता दाखवण्यासाठी रात्री ९ वाजता दिवे, पणत्या आणि मोबाई ल टॉर्च प्रज्ज्वलित करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांकडून टिकेची झोड उठली आहे.

 जितेंद्र आव्‍हाड म्हणाले की, संपूर्ण देशाला आशा होती की, मोदीसाहेब…जीवनाश्यक वस्तुंबाबत बोलतील, मास्क-सॅनिटाईझर याची उपलब्धता मुबलक प्रमाणात होईल, आम्ही कोरोनावर लस शोधून काढतोय…देशातील अवघड परिस्थितील लोकांना आधार मिळेल, असे काही बोलतील…सर्वांच्या जीवनात अंधार झाला असतना काहीतरी लोकांच्या जीवनात उजेड निर्माण होईल्, असा निर्णय घेतली अशी अपेक्षा होती…

मात्र, मोदींनी इव्‍हेट केला…लोकांना दिवे, मेनबत्या आणि मोबाईलचे टॉर्च लावायला सांगितले…हा केवळ नादानपणा आणि बालिशपणा आहे…पण मी मूर्ख नाही…मी दिवा-मेनबत्त्या पणत्या पेटवत बसणार नाही…

व्‍हीडिओ पहा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button