breaking-newsपिंपरी / चिंचवड

वैयक्तीक पातळीवर औषध फवारणी केल्यास नगरसेवकांवर कारवाई होणार – आयुक्त श्रावण हर्डीकर

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना (कोविड – १९) विषाणूचा प्रादुर्भाव झालेला असून त्याकरिता उपाययोजना म्हणून काही नागरिकांकडून, खाजगी संस्थांकडून तसेच सन्माननीय नगरसदस्यांकडून त्यांचे परिसरामध्ये स्वेच्छेने औषध फवारणी करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. तथापि, शासनामार्फत देण्यात आलेल्या निर्देशानुसार अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी औषध फवारणी करणे बेकायदेशीर असून कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी फवारणी करणेस परवानगी नाही.

कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरामध्ये शास्त्रोक्त पध्दतीने औषध फवारणी करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:हून औषध फवारणी करण्याची आवश्यकता नाही.

तरी शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आरोग्य विभागामार्फत शहरामध्ये आवश्यक त्या ठिकाणी प्राधान्याने औषध फवारणी करण्यात येत आहे. तसेच आरोग्य विभागामार्फत करण्यात येणारी औषध फवारणी ही शास्त्रोक्त पध्दतीने करण्यात येत असल्याने त्याकरिता कोणत्याही सूचना अथवा मार्गदर्शन कर्मचा-यांना करु नये. सबब कोणत्याही नागरिक, खाजगी संस्था अथवा सन्माननीय सदस्यांनी सार्वजनिक परिसरामध्ये औषध फवारणीची कार्यवाही करु नये, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button