breaking-newsपुणे

सचिन अंदुरेला अमाेल काळे यानेच पिस्तूल पुरवले

पुणे –  अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरेकडून जप्त करण्यात आलेले पिस्तूल अमोल काळे यानेच पुरवले असल्याची माहिती समाेर अाली अाहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी काळे याला 14 दिवसांची सीबीआय कोठडी द्यावी अशी मागणी सीबीआय च्या वकिलांनी केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम एस ए सय्यद यांनी काळे याची 14 सप्टेंबर पर्यंत सीबीआय कोठडीत रवानगी केली.

काळे याच्या कोठडीची मागणी करताना ढाकणे यांनी न्यायालयाला सांगितले की, उच्च न्यायालयाने या प्रकरणाबाबत एक आदेश दिला असून न्यायालयात सुनावणी न होता संबंधित केसमधील केस डायरी, न्यायालयानत सादर करण्यात यावी त्यानुसार न्यायालयाने निर्णय दयावा. त्यामुळे सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला नाही. या प्रकरणातील तपास संवेदनशील असून त्यात करण्यात आलेल्या तपासाची माहिती माध्यमांना जाऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आल्याचे समजते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button