यंदाच्या वर्षी विवाह मुहूर्ताचा धूमधडाका
पुणे |महाईन्यूज|
नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे. जी मंडळी यंदाच्या वर्षात लग्नाचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष अधिक चांगले आहे. कारण यंदाच्या वर्षात लग्नाचे मुहूर्त हे मोठ्या प्रमाणात आहेत. हिंदू पारंपारिक, धार्मिक रीतिरिवाजांनुसार, पौष महिन्याप्रमाणेच आषाढ ते कार्तिक या चातुर्मासामध्ये विवाह टाळले जातात. यंदा यामध्येही काढीव मुहूर्त जाहीर केले जाणार आहेत.
जानेवारीमध्ये हिंदू कॅलेंडरनुसार, पौष महिना असल्याने या महिन्यात विवाह करणं किंवा यासंदर्भात कोणतीही बोलणी केली जात नाही. २४ जानेवारीला पौष महिना संपणार आहे. त्यानंतर गुरु-शुक्र अस्त काल आणि चतुर्मास वगळताही यंदा जवळपास ५० विवाह मुहूर्त आहेत.
२०२० मधील विवाह मुहूर्त
जानेवारी २०२०: २९,३० आणि ३१
फेब्रुवारी २०२० : ३ ते ५, १० ते २१, २५ आणि २७
मार्च २०२० : १ ते ४, ७ ते १३
एप्रिल २०२० : १४,१५, २५,२६ आणि २७
मे २०२० : १ ते ४, ६ ते१३, १७ ते १९ आणि २३ ते २५
जून २०२० : १३ ते १५, आणि २५ ते ३०
नोव्हेंबर २०२० : २६, २९ आणि ३०
डिसेंबर २०२० : १, २ आणि ६ ते ११