breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मर्सिडीज पुण्यात बनवणार १५०० बेडचे हॉस्पिटल

भारतात करोनामुळे मृत्युमुखींची संख्या दुहेरी झाली आहे. करोनावर मात करण्यासाठी भारत सरकारला सर्व स्तरांतून पाठींबा आणि मदत केली जात आहे. जर्मनीची प्रसिद्ध ऑटो कंपनी मर्सिडीज बेंजने पुण्याजवळील चाकन परिसरात १५०० बेडचे हॉस्पिटल बनवणार असल्याची घोषणा केली आहे. चाकन परिसरात ही जागा आहे. परंतु, सध्या देशभरात लॉकडाऊन असल्याने या ठिकाणचे काम बंद आहे. याचा वापर मर्सिडिज हॉस्पिटलसाठी करणार आहे. या हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन वॉर्डमध्ये १५०० बेड असणार आहेत.

कंपनीने सांगितले की, ही सुविधा म्हाडाच्या परिसरात असणार आहे. या हॉस्पिटलमध्ये ३७४ खोल्या आहेत. कंपनीचे सर्व कर्मचारी एक-एक दिवसाचा पगार या मोहीमेसाठी देणार आहेत. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिलेली रक्कम कंपनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री निधीत जमा करणार आहे. करोनावर मात केल्यानंतर तसेच देशातील करोना संपुष्टात आल्यानंतर या हॉस्पिटलमधील सर्व उपकरणे खेडच्या रुग्णालयाला देण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button