breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपळे सौदागर येथील महापालिकेच्या क्रिडा मैदानाची नगरसेवकांनी केली पाहणी

पिंपरी / महाईन्यूज

पिंपळे सौदागर, रहाटणी प्रभाग २८ मधील कुणाल आयकॉन रोडवरील महापालिकेमार्फत विकसित होणा-या खेळाच्या मैदानाची माजी विरोधी पक्षनेते तथा विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेविका शीतल काटे, भाजप नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि राष्ट्रवादी युवा नेते संदीप काटे यांनी पाहणी केली.

यावेळी स्थापत्य विभागाचे उपअभियंता सुनील पाटील, शाखा अभियंता नरेश जाधव, बी. व्ही. जी. इंडीयाचे व्यवस्थापक अधिकारी पाटील, सल्लागार सचिन आपटे, शशी काटे, भुषण काटे, मच्छिंद्र काटे आदी उपस्थित होते. या मैदानावरील किरकोळ कामे लवकर पूर्ण करून मैदान नागरिकांसाठी खुले करण्यात यावे, असे नाना काटे यांनी अधिका-यांशी संवाद साधताना सांगितले.

पिंपळे सौदागर येथील रोझ आयकॉन शेजारी महापालिकेचे खेळाचे मैदान विकसित होत आहे. या मैदानामध्ये फुटबॉल, क्रिकेट ग्राउंड, टेनिस कोर्ट, ओपन जिम, लहान मुलांसाठी विविध खेळाची व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांसाठी बैठक व्यवस्था, चेंजिंग रूम, सिंथेटिक ट्रॅक, टर्ब ग्राउंड, प्रेक्षकासाठी बैठक व्यवस्था, टॉयलेट ब्लॉक इत्यादी सोयी सुविधांनी युक्त असे मैदान नागरिकांसाठी करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button