breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#waragainstcorona: ‘बिग बझार’ कडून ऑनलाईन फसवणूक : अविनाश जाधव (व्हीडिओ)

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी

लॉकडाउनच्या काळात बिग बझारकडून नागरिकांची ऑनलाईन फसवणूक होत आहे. दुसरीकडे शाळांकडून शालेय शुल्क भरण्यासाठी तगादा लावला जात आहे. याबात राज्य शासनाने ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे.

 १. बिग बझारची ऑनलाइन फसवणूक-
ठाणे आणि जवळपासच्या विभागातून बऱ्याच तक्रारी आल्या आहेत की, बिग बझार वर ऑनलाइन शॉपिंग केल्यावर, एका अनोळखी व्यक्ती कडून फोन येऊन तुम्हाला त्या शॉपिंग चे पैसे भरायला सांगितले जातात. जे की बिगबझार ला जात नाहीत, आणि ह्या अडचणीच्या काळात बिग बझार ने सुद्धा हात वर केले आहेत. तर ऑनलाइन खरेदी करताना चार वेळा तपासून मगच पैसे पाठवा.
२. शाळांचे फी भरण्यासाठी तगादा:
ठाण्यातल्या मोठं मोठ्या शाळा लोकांकडे फी भरण्यासाठी तगादा लावत आहेत, नाही भरले तर नाव कमी करण्याची धमकी देत आहेत. शिक्षणमंत्र्यांनी आधीच है कळत फी मागू नका असे शाळांना आदेश दिले आहेत. तर असे कुठे घडत असेल तर आमच्या मनसे प्रमुखनशी संपर्क साधा.
३. मुंबईत अडकलेल्याना गावाकडे जाण्याची परवानगी:
महाराष्ट्राच्या अनेक गावाकडील लोक आज मुंबईत अडकून पडले आहेत. इथे रेशन पुरत नाही, नोकऱ्या बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्य चाकरमानी होरपळून निघत आहे. तरी राज्य शासनाने योग्य ती पाऊले उचलून ह्या अडकलेल्याना आपापल्या गावी जण्याचा पर्याय उपलब्ध करून द्यावा सन्मानिय मुख्यमंत्री आणि राज्यशासनाला माझी कळकळीची विनंती आहे, असेही अविनाश जाधव यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button