breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादी नगरसेवकांच्या मानधनातून वारकऱ्यांना भेटवस्तू देवू – विरोधी पक्षनेते दत्ता साने

पिंपरी – महापालिकेकडून यंदा संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्यातील दिंडीप्रमुखांना भेटवस्तू देण्याचे नाकारण्यात आले आहे. यावरुन वारक-यांना भेटवस्तू द्यायला भाजपकडे पैसे नाहीत. महापालिकेची तिजोरी भाजपच्या भ्रष्टाचारामुळे रिकामी झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या मानधनातून वारक-यांना भेटवस्तू देवू, असा उपरोधिक टोला विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी लगावला आहे.

महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, संताची भूमी म्हणून पिंपरी चिंचवड शहराची ओळख आहे. दरवर्षी महापालिकेकडून दिंडी प्रमुखांना भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. सत्ता कोणत्याही पक्षाची असो हि परंपरा अाम्ही अखंडपणे चालू ठेवली होती. गेल्या वर्षी ताडपत्री खरेदी केलेल्या भ्रष्टाचारामुळे सत्ताधारी भाजपाची नामुष्की झाली. म्हणूनच यंदा त्यांनी वारकऱ्यांना भेटवस्तू न देण्याचा निर्णय घेतलायं. सत्ताधाऱ्यांच्या या निर्णयाचा निषेध व्यक्त करतो. वर्षभर भ्रष्टाचार करत यांनी महापालिकेची तिजोरी लुटून खाल्ली आहे. यांना सांप्रदायाशी काहीच देणे-घेणे नाही. सत्ताधारी आता नास्तिक झालेत. त्यांच्याकडे पैसे नसतील तर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या मानधनातून वारकऱ्यांना भेटवस्तू द्यावी असे मत विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी व्यक्त केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button