breaking-newsमुंबई

#CoronoVirus:मुंबईत 40 बेस्ट कर्मचारी कोरोनाबाधित

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. डॉक्टर, नर्स, पोलीस कर्मचारी यांच्यासह आता बेस्ट कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मुंबई शहरात आतापर्यंत 40 बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे.

मुंबई शहर हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मुंबईतील 40 बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यातील तीन कर्मचाऱ्यांचा दुदैवाने मृत्यू झाला आहे. तर सुदैवाने यातील 9 जणांना डिस्चार्ज देण्यात आले आहेत.

दरम्यान यातील 50 टक्के कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत.

बेस्ट कर्मचाऱ्यांना होणारा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी `बेस्ट कोविड रॅपिड अॅक्शन टीम´ तयार करण्यात आली आहे. या रॅपिड अॅक्शन टीममध्ये बेस्टच्या सर्व विभागांच्या प्रमुखांचा समावेश असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button