breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

खासदार, आमदारांपेक्षाही तुषार कामठेंचे दिल्लीत वजन, चक्क गडकरींनी दिली वेळ

  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना दिल्या शुभेच्छा
  • स्थानिक नेत्यांच्या शिवाय केला दिल्ली दौरा

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे भाजपचे नगरसेवक तुषार कामठे शहराच्या राजकारणात कायमच चर्चेत राहिले आहेत. लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कामठे यांनी दिल्लीत जाऊन शुभेच्छा दिल्या आहेत. शहरातला एकही नेता सोबत नसताना कामठे यांनी गडकरी यांची भेट घेतल्याने शहराच्या राजकारणात स्वतःची छबी उंचावण्याचा त्यांचा हा प्रयत्न वाटत आहे. त्यांच्या रुपाने पिंपळे निलखमधून एक नवीन नेतृत्व शहराच्या राजकारणात उभारी घेत असल्याचे संकेत मिळत आहेत.

नागपूर लोकसभा मतदार संघातून नितीन गडकरी विजयी झाले. शहरातल्या गडकरी गटाला मोदींच्या विजयापुढे त्यांच्या विजयाचे स्मरण राहिले नाही. नगरसेवक तुषार कामठे यांनी मात्र, दिल्लीत जाऊन गडकरी यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांना विजयी झाल्याबद्दल बुके देऊन शुभेच्छा दिल्या. शहरातला एकही नेता सोबत नसता दिल्लीत जाऊन गडकरींची भेट घेऊन कामठे यांनी वेगळेच संकेत दिले आहेत. पिंपळे निलखमध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांचे खंदे समर्थक सुरेश चोंधे यांच्यानंतर आता नेता राहिलेला नाही. कामठे यांच्या माध्यमातून या भागातील नवीन नेतृत्व तयार होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

शहरात राज्यसभेचे खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणचे अध्यक्ष सदाशिव खाडे, पक्षनेते एकनाथ पवार असे नेत्यांचे बळ असताना कामठे हे यांच्यापैकी कोणाशीस संबंधीत नसल्याचे दाखवितात. त्यांचे कोणाशीही वैर नसले तरी ते कोणत्याच गटाशी संलग्न असल्याचे दाखवित नाहीत. आता त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत सदिच्छा भेट घेऊन पुन्हा ते चर्चेत आले आहेत. एकाही स्थानिक नेत्याला मध्यस्ती न ठेवता थेट उच्च पदस्त नेत्याशी संपर्क वाढवून कामठे स्वतःची वेगळी ओळख तयार करण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत.

म्हणून कामठे कायम चर्चेत

पिंपरी-चिंचवड महापालिकेवर 2017 च्या निवडणुकीत भाजपची सत्ता आली. त्यात पिंपळे निलख प्रभागातून तुषार कामठे भाजपच्या तिकीटावर विजयी झाले. तत्पुर्वी त्यांनी पिंपळे निलख भागातील रहिवाशांचे प्रश्न उचलून आंदोलने, मोर्चे काढले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत मतदारांना कामठे यांची वेगळी ओळख सांगावी लागली नाही. नागरिकांचे प्रश्न सोडविणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. पालिकेवर भाजपची सत्ता आल्यानंतर देखील त्यांनी आपल्या भूमिकेत तसुभरही बदल केला नाही.

कचरा समस्या, अपुरा पाणी पुरवठा, शासकीय कागदपत्र वेळेत न मिळणे, अधिका-यांचा बेजबाबदारपणा अशा मुद्यांवरून पत्रके काढून पालिका प्रशासनाकडे त्यांनी पाठपुरावा केला आहे. अनधिकृत फ्लेक्सच्या मुद्यावरून सुध्दा त्यांनी प्रशासनाच्या विरोधात पालिकेसमोर आंदोलन केले आहे. पालिकेवर सत्ता असताना अधिकारी ऐकत नसल्यामुळे प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला होता. अशा भूमिकांमुळे कामठे सतत चर्चेत राहिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button