breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Lockdown: भारतीयांना मायदेशी आणण्याचं ऑपरेशन सुरु, नौदलाच्या तीन युद्धनौका रवाना

करोना व्हायरसमुळे जगातील अनेक देश लॉकडाउनमध्ये आहेत. त्यामुळे हजारो भारतीय त्या-त्या देशांमध्ये अडकून पडले आहेत. अशा परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याची मोहिम सुरु झाली आहे. मालदीव आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी भारतीय नौदलाच्या तीन युद्धनौका रवाना झाल्या आहेत.

संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने मंगळवारी सकाळी पीटीआयला ही माहिती दिली. मुंबई किनाऱ्यावर तैनात असलेली एनएस जलाश्व, आयएनएस मगर या युद्धनौका सोमवारी रात्री मालदीवला रवाना झाल्या आहेत.

आयएनएस शार्दुल दुबईला पाठवण्यात आली आहे. या तिन्ही युद्धनौका भारतात दाखल झाल्यानंतर कोची मध्ये येतील अशी माहिती संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने दिली. आयएनएस मगर, आयएनएस शार्दुल या दक्षिण नौदल कमांडच्या तर आयएनएस जलाश्व पूर्व नौदला कमांडची युद्धनौका आहे.

ज्या नागरिकांमध्ये करोनाची लक्षणं नाहीत अशाच लोकांना परत आणण्यात येणार

अनेक भारतीय अन्य देशांमध्ये अडकले आहे. दरम्यान त्यांना टप्प्याटप्प्यानं मायदेशी आणण्याची प्रक्रिया ७ मे पासून सुरू करण्यात येणार आहे. ज्या नागरिकांमध्ये करोनाची लक्षणं नाहीत अशाच लोकांना परत आणण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे. तसंच त्यांना परत आणण्यासाठी विमानं तसंच नौदलाची मदत घेण्यात येणार आहे. परंतु प्रवासाचा खर्च मात्र संबंधित प्रवाशांनाच करावा लागणार आहे. भारतात परतल्यानंतर त्यांना १४ दिवस क्वारंटाइनमध्ये राहावं लागणार आहे.

“परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यास सरकार त्यांची मदत करेल. आवश्यकता असल्यासच त्यांना भारतात परतण्याची परवानगी देण्यात येईल. तसंच ही प्रक्रिया टप्प्याटप्प्यानं राबवण्यात येणार आहे. त्यांना विमान अथवा नौदलाच्या नौकांद्वारे भारतात आणसं जाईल, भारतीय दूतावास आणि उच्चायोगाला परदेशात अडकलेल्यांची एक यादी तयार करण्यास सांगण्यात आलं आहे, प्रवासाचा खर्च प्रवाशांनाच करावा लागणार आहे,” असं गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button