breaking-newsआंतरराष्टीय

#CoronoVirus:पांढरे पडले फुप्फुस 32 दिवस व्हेंटिलेटर राहिल्यानंतर कोरोनावर मिळवला विजय


मॅसाच्युसेट्सच्या हिंगममध्ये राहणाऱ्या किम बेलो फोनवर डॉक्टर अॅमी रुबिन यांच्याशी बोलत होत्या. माझे पती वाचतील ना, असे विचारले. त्यांचे ४९ वर्षीय पती हॉस्पिटलमध्ये कोरोनाशी लढत होते. डॉक्टर म्हणाले, आम्ही प्रयत्न करत आहोत. तुम्हाला खरे सांगायचे तर, त्यांच्या वाचण्याची शक्यता कमी आहे. किम सांगतात, जिमने ७ मार्चला न्यू हॅम्पशायरमधील व्हाइट मांउटेन सर केले होते. हे सुमारे २००० मीटर उंच आहे. परतल्यानंतर त्यांना खूप ताप आला. दोन-तीन दिवसांनंतर खोकलाही सुरू झाला. डॉक्टरांनी अँटिबायोटिक्स देऊन घरी पाठवले. ६ दिवसांनंतर ताप १०३ डिग्री आणि श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी त्वरित व्हेंटिलेटरवर ठेवले.


डॉ.पॉल करियर सांगतात, एक्स-रे बघून डॉक्टर चकित झाले. जिमचे फुप्फुस हाडांप्रमाणे पांढरे झाले होते. हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट चेस्ट एक्स-रेपैकी एक आहे. आम्हाला वाटले ते वाचणार नाहीत. तरीही एक्स्पेरिमेंटल ड्रग, हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन, रेमडीसिव्हिर आणि लाइफ सपोर्ट सिस्टिमचा पर्याय अवलंबला. यानंतर हेल मॅरी सिस्टिम अवलंबली. यासाठी मशीन ३० सेकंदांसाठी काढायचे होते. मात्र या ३० दिवसांत जिमचे प्राणही जाऊ शकत होते. डॉ. युवल रज म्हणाले, जर हा त्यांना वाचवण्याचा मार्ग असेल तर त्यांना मारणेच चांगले ठरेल. १८ मार्चला जिमच्या प्रकृतीत थोडी सुधारणा जाणवली. मात्र काही वेळेनंतरच रक्तात ऑक्सिजनची पातळी घटायला लागली. डॉक्टरांनी इम्युनोसप्रेसिव्ह औषध दिले. फरक नव्हता. शेवटचा पर्याय म्हणून मानेत व पायात नळ्या टाकल्या. त्या हार्ट-लंग्ज बायपास मशीन ईसीएमओला जोडल्या. हे मशीन शरीरातून रक्त काढून त्यात ऑक्सिजनचे प्रमाण वाढवून पुन्हा शरीरात टाकते. नर्स केरी वोइरकेल सांगतात की, २८ मार्चला जिमच्या प्रकृतीत सुधारणा दिसली.


मानेखालून उशी काढल्याबरोबर, जिमच्या भुवयांची हालचाल झाली. डोळे उघडताच त्यांनी माझे हात पकडले. तुमची पोझिशन नीट करू, असे विचारल्यावर त्यांनी थम्स अप केले. मी मोठ्याने ओरडत म्हणाले, जिम परतले आहेत. १४ एप्रिलला जिमना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले. ३२ दिवसांत पहिल्यांदाच ते स्वत: श्वास घेऊ शकत होते. जिम आयसीयूतून बाहेर पडल्यानंतर संपूर्ण स्टाफने टाळ्या वाजवून स्वागत केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button