breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या नेत्यांचा ‘एचए’च्या जमिनीवर डोळा म्हणूनच कंपनी बंद पाडली

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही बिल्डरांची पार्टी आहे. दादा हा इथला वतनदार आहे. आता त्याची गावठाणांवर नजर आहे. एचए कंपनी बंद पडण्यामागे राजकारण म्हणजे त्यांचा एचएच्या जमिनीवर डोळा आहे, अशी घणाघाती टिका वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित आघाडीची आज पिंपरीतील एचए मैदानावर सभा सुरू आहे. सभेत नते प्रकाश आंबेडकर बोलत आहेत. आंबेडकर म्हणतात की, 70 वर्ष आपण वंचित राहिलो आहेत. प्रतिष्ठेपासून वंचित राहिलो, अधिकारांपासून वंचित राहिलो, आमदार-खासदार होण्यापासून वंचित राहिलो. विकासापासून वंचित राहिलो. आता आपली मान दुस-याच्या खांद्यावर टेकवायची नाही. 70 वर्ष त्यांनी आपल्या मानेवरती सु-या फिरवण्यात आहेत. आता आपलं सरकार येणार आहे. आपल भविष्य आपण स्वतः लिहिणार आहोत.

प्रकाश आंबेडकर म्हणतात की, आता आम्हाला स्वतंत्र सत्ता पाहिजे. कारण, मावळ, आंबेगाव, आदीवासी, पुणे जिल्हा सत्तेचे माहेरघर आहे. या माहेरघरात कुपोषणातून किती जणांचा जीव गमवला याची आकडेवारीच नाही. या महाराष्ट्रातला जाणता राजा म्हणून त्यानं हे सांगावं, असे आव्हान आंबेडकर यांनी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांना दिले. कल्याण, ठाणे, डोंबिवली, मुंबईमध्ये 200 गावं आहेत. या दोनशे गावांना आजही प्रॉपर्टी कार्ड नाही. आमच्या गावांना झोपडपट्ट्या म्हणून एसआरए लावला जात आहे. पुन्हा या जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रकार होत आहे. हे कदापी होऊ देणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button