breaking-newsआंतरराष्टीय

#CoronoVirus:वुहानमध्ये सर्वाधिक खबरदारी घेत आहे सरकार;बरे झाल्यावरही 28 दिवसांचे क्वॉरंटाइन


चीन कोरोना महामारीच्या सर्वात कठीण काळातून जात आहे. कोरोनाचे रुग्ण व त्याचे मृत्यू कमी होत आहेत. लोकांचे लक्ष आता दोन गोष्टींकडे आहे. पहिली- बरे झालेल्या लोकांची स्थिती. दुसरी- पुन्हा ते दिवस येऊ नयेत यासाठी कोणते उपाय योजावेत. चीनमध्ये कोरोना पूर्णपणे बरा होऊ शकतो की नाही याचे अद्याप पुरावे मिळालेले नाहीत. शास्त्रज्ञ आणि वैद्यकीय कर्मचारी समस्येवर तोडगा काढण्याचा मार्ग शाेधत आहेत. वुहानमधील २५ वर्षीय युवकाने सांगितले की, तो आता कोरोनापासून बरा झाला आहे. मात्र त्याचे फुप्फुस कमकुवत झाले आहे. ते चांगले होण्यासाठी वेळ लागेल. हा तरुण जानेवारीच्या शेवटी कोरोना पॉझिटिव्ह झाला होता. तो फेब्रुवारीत बरा झाला. पुन्हा बाधित होण्याचा धोका काय राहील याबाबत डब्ल्यूएचओने आधीच इशारा दिला आहे. मी न्यूक्लिक अॅसिड चाचणी एकापेक्षा जास्त वेळा केली आहे. यामुळे नुकसान होऊ शकते. डॉक्टरांंनी फुप्फुसाच्या आजारासाठी नेहमीची औषधी दिली आहे. रुग्णालयात सुटी मिळाल्यानंतर तो १४ दिवस घरीच क्वाॅरंटाइन राहील.


वुहानमध्ये आतापर्यंत १४ प्लस १४ मॅनेजमेंटचे पालन करण्यात येत आहे. याचा अर्थ असा की, बरा होणारा रुग्ण आधी वैद्यकीय केंद्रात १४ दिवस क्वॉरंटाइन केला जातो. एवढ्या काळानंतर त्याचा अहवाल निगेटिव्ह आला तर त्याला घरात १४ दिवसांसाठी वेगळे ठेवले जाते. चीनच्या राज्य परिषदेने याची पुष्टी केली आहे. शांघाय, बीजिंग, नानझिंगसह १० शहरांमध्ये न्यूक्लिक अॅसिड चाचणी केली जात आहे. शांघायमध्ये त्याची सुरुवात करण्यात आली. येथे ती सक्तीची करण्यात आली आहे. ही एक स्व-पेड चाचणी आहे. शांघाय आरोग्य आयोगानुसार यात घशातील स्वॅबचे नमुने घेतले जातात. केवळ २४ तासांत या चाचणीचा निकाल येतो. या चाचणीतून विषाणूच्या आरएनएची माहिती मिळते. सामान्यत: श्वसनमार्गातूून नमुने घेतले जातात. यात लाळेचे मिश्रण असते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button