breaking-newsमनोरंजन

अभिनेता इरफान खानची प्रकृती बिघडली,आयसीयूमध्ये उपचार सुरु

मुंबई : प्रसिद्ध अभिनेता इरफान खानची सध्या कॅन्सरशी झुंज सुरु आहे. त्याच्यावर मागील अनेक दिवसांपासून उपचार सुरु आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये आज (28 एप्रिल) सकाळी त्याची तब्येत अचनाक बिघडली . यानंतर त्याला मुंबईतील कोकिळा बेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

इरफान खानला न्यूरोएन्डोक्राईन ट्युमर झाला आहे. त्यावरच त्याचे उपचार सुरु आहेत. लॉकडाऊनमुळे लागू असलेल्या निर्बंधांमुळे त्याच्या या नियमित उपचारांमध्ये अडथळा तयार होत होता. त्यामुळेच त्याला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. दरम्यान, नुकतेच इरफान खानच्या आई सईदा बेगम यांचं निधन झालं होतं. त्यावेळी लॉकडाऊनमुळे त्याला आईच्या अंत्यसंस्कारासाठीही जाता आले नसल्याचंही वृत्त होतं. त्यावेळी इरफानने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आईचं अंतिम दर्शन घेतलं होतं. सध्या इरफान खान मुंबईत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button