breaking-newsआंतरराष्टीयआरोग्य

#CoronoVirus:पल्स ऑक्सिमीटरने घरी बसून तपासू शकता ऑक्सिजनची पातळी, कोरोनाच्या धोक्याचे संकेत देते घटणारी पातळी

एका लहानशा डिव्हाइसने तुम्ही घरबसल्या जाणून घेऊ शकता की तुम्ही कोरोनाच्या तावडीत तर नाही येणार? हे डिव्हाइस आहे पल्स ऑक्सिमीटर, जे तुम्हाला ताप व खोकल्यासारखी लक्षणे दिसण्याच्या आधी कोरोनाचे संकेत देऊ शकते. शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी होणे कोरोना संसर्गाचे सुरुवातीचे लक्षण आहे. पल्स ऑक्सिमीटर ही पातळी तपासतो. न्यूयॉर्कच्या बेलेव्ह्यू रुग्णालयातील डॉ. रिचर्ड लेव्हिटन सांगतात, कोरोना रुग्णांची ऑक्सिजन पातळी वेगाने कमी होते. हे गॅजेट लवकर मदत घेण्यासाठी संकेत देऊ शकते.

ऑक्सिजन सामान्य असल्यास लक्षणांकडे दुर्लक्ष नको

हे काय सांगते?

कपड्यांवर लावले जाणारे क्लिपसारखे पल्स ऑक्सिमीटर बोटावर लावतात. काही सेकंदांत ते रक्तातील ऑक्सिजनची पातळी व हृदयाचे ठाेके सांगते. निरोगी लोकांची ऑक्सिजन पातळी ९५% ते ९८% दर्शवते. ती ९२% किंवा त्यापेक्षा कमी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. सामान्य व्यक्तीच्या हृदयाचे ठोके मिनिटाला ६० ते १०० असतात.


रीडिंग कमी असल्यास?

रीडिंग ९२ किंवा कमी असल्यास डॉक्टरांना सांगा. ऑक्सिजन पातळी वाढवणे सोपे आहे. डॉ. अन्ना मॅरी चांग सांगतात, त्यांची ऑक्सिजनची पातळी ८८% होती. त्यांना दाखल करण्यात आले. पोटावर झोपवून मास्कसह ऑक्सिजन देण्यात आला. या स्थितीत फुप्फुस उघडते आणि जास्त आरामदायक होते. नंतर त्या कोरोना पॉझिटिव्ह निघाल्या. आता त्या बऱ्या आहेत. व्हेंटिलेटरची गरज भासली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button