breaking-newsक्रिडा

आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ऑस्ट्रेलियाची भारतीय संघाला खास सूट

मेलबर्न. ऑस्ट्रेलियन सरकार देशातील क्रिकेट मंडळाचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी मोठा निर्णय घेऊ शकते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला (सीए) ३०० मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलरचे (जवळपास २४३५ कोटी रुपये) नुकसान होऊ शकते. त्यामुळे येथील सरकार भारतीय क्रिकेट संघाला प्रवासबंदीत मुभा देऊ शकते. कोविड १९ महामारीमुळे ऑस्ट्रेलियात ३० सप्टेंबरपर्यंत विदेशी लोकांच्या येण्यावर बंदी आहे. भारतीय संघाला डिसेंबर-जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. महामारीमुळे सीएला जवळपास १४६० कोटी रुपये नुकसान झाले आहे. सीए पहिलेच ८० टक्के कर्मचाऱ्यांना जूनपर्यंत २० टक्के वेतन आणि इतरांना ८० टक्के वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी ऑस्ट्रेलियन प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसनने राज्य सरकारला मदतीसाठी खेळांना मुभा देण्याचा विचार असल्याचे म्हटले.


अहवालानुसार, ‘सीएला याबाबतीत सरकारकडून सकारात्मक उत्तर मिळाले आहे.’ क्रिकेट ऑस्ट्रेलियाला या आर्थिक वर्षात २४०० कोटी रुपयांच्या कमाईची अपेक्षा आहे, ज्यातील सर्वाधिक रक्कम प्रसारण हक्कातून मिळते. क्रिकेट केवळ टीव्हीवर दाखवले तरी केवळ २४० कोटी रुपयांचे नुकसान होईल. ऑस्ट्रेलियासह इंग्लंड मंडळदेखील विना प्रेक्षक सामने खेळवण्याची तयारी करत आहे. कारण नुकसान कमी केले जावे. इंग्लिश मंडळ इतर मंडळांशी चर्चा करण्याचे नियोजन करत आहे. सध्या इंग्लंडने देशातील क्रिकेटवर एक जुलैपर्यंत बंदी घातली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button