breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

‘पत्रकार क्षेत्रातील नवी आणि सकारात्मक क्रांती घडवणारा ‘‘माई मीडिया २४’’; विधान परिषद उपसभापती नीलमताई गोऱ्हे

'सहकार तत्त्वावर काम करणारे पत्रकारिता क्षेत्रातील पहिले वेब पोर्टल'; उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई : मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात माई या राष्ट्रीय संघटने अंतर्गत ‘माई मीडिया २४’ या वेबपोर्टलचे उद्घाटन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि उद्योगमंत्री श्री उदयजी सामंत यांच्या शुभहस्ते विधान भवनात संपन्न झाले. याप्रसंगी माई संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष शीतल करदेकर , कोषाध्यक्ष चेतन काशीकर, सचिव सचिन चिटणीस उपस्थित होते.

या उद्घाटन प्रसंगी विधान परिषदेचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यांनी सांगितले की, हा उपक्रम पत्रकार क्षेत्रातील नवी आणि सकारात्मक क्रांती घडवणारा असेल अस म्हणत शुभेच्छा दिल्या. संघटनेच्या अध्यक्षा शीतल करदेकर या आजच्या काळातील रजनी आहेत असे शब्द उच्चारत त्यांचं कौतुक केलं. माई मीडिया २४ हा डिजिटल विश्वातील विश्वसनीय आणि सच्चा पत्रकारितेचे उन्मुक्त माध्यम आहे. जे राजकीय, व्यवसाय, मनोरंजन अशा विविध क्षेत्रातील घडामोडींचे त्वरित आणि योग्य वृत्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तत्पर राहणार आहे. तसेच सहकार तत्त्वावर काम करणारे पत्रकारितेचे हे पहिलेच डिजिटल माध्यम आहे असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – मनोज जरांगेंची प्रकृती अचानक बिघडली, डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

उद्योगमंत्री उदयजी सामंत म्हणाले, माई मीडिया २४ हे सहकार तत्त्वावर काम करणार असणार म्हणून यातून पत्रकारितेत स्थिरता येईल आणि हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उत्तम मंच ठरेल अशा शब्दात शुभेच्छा दिल्या.

या उद्घाटन सोहळ्याला माई मीडिया २४ च्या मुख्य संपादक आणि माई संघटनेचे संस्थापक आणि अध्यक्ष शीतल करदेकर, पोर्टलचे संपादक आणि संघटनेचे संघटन सचिव सचिन चिटणीस, पोर्टलचे उपसंपादक सुरज खरटमल आणि गणेश तळेकर, संस्थापक सदस्य सुनील कटेकर, सल्लागार संतोष भिंगार्डे आणि संजय घावरे उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button