breaking-newsआंतरराष्टीय

#coronovirus:कोरोना चिनी संशोधकांच्या लहरी प्रयोगांचा परिणाम : रशियन तज्ञ

माॅस्को. वुहानचे संशोधक तेथील प्रयोगशाळेत लहर आल्यासारखे प्रयोग करत होते. त्यातूनच कोरोनासारखा विषाणू तयार झाला, असा दावा कोरोनामुळे हैराण झालेल्या रशियाच्या एका वरिष्ठ मायक्रोबायोलॉजिस्ट पीटर चुमाकोव्ह यांनी केला आहे. विषाणूच्या साह्याने आजार निर्माण करण्याच्या क्षमतेची पडताळणी करू पाहत होते. त्या प्रक्रियेतूनच घातक विषाणू तयार झाला, असे चुमाकोव्ह यांना वाटते. संशोधकांनी जीनोमला आत टाकल्यामुळे विषाणूत मानवी पेशींमध्ये संसर्ग करण्याची क्षमता निर्माण झाली आहे. एका मुलाखतीत चुमाकोव्ह यांनी हा दावा केला. अनेक गोष्टींना विषाणूत घुसडवण्यात आले आहे. त्यामुळे जीनोमने नैसर्गिक साखळीची जागा घेतली आहे. त्यामुळेच कोरोनामध्ये अनेक विशेष गोष्टींचा समुच्चय पाहायला मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button