breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

साताऱ्यात पुन्हा लॉकडाऊन; 17 जुलैच्या ते 26 जुलै पर्यंत असणार लॉकडाऊन…

राज्यात अनेक भागात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुन्हा लॉकडाऊन करण्यात येत आहे.जालाना, औरंगाबाद ,त्यानंतर आजपासून पुणे आणि आता सातारा जिल्ह्यातही लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. साताऱ्यात सध्या १८४५ कोरोना बाधित रुग्ण आहेत. त्यामुळे या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी कडक निर्बंध लावणे गरजेचे आहे, असे सातारा जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी शेखर सिंह यांनी म्हटलं आहे. त्यामुळे साताऱ्यात १७ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते २६ जुलैच्या रात्री १२ वाजेपर्यंत असा 10 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्यात काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याचे आदेशही काढण्यात आले आहेत.

साताऱ्यात लॉकडाऊन दरम्यान काय बंद आणि काय सुरू राहणार ते पाहुया

  • किराणा दुकाने, किरकोळ विक्रेते, इतर व्यवसाय करणारे व्यापारी यांची दुकाने १७ जुलै रात्री १२ पासून ते २२ जुलै रात्री १२ पर्यंत बंद राहतील. २२ जुलै पासून २६ जुलैपर्यंत ही दुकाने सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत सुरू राहतील. मात्र, या काळात केवळ अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने पूर्णपणे सुरू राहतील.
  • २२ ते २६ जुलै या कालावधीत केवळ घरपोच सेवा सुरू राहतील.
  • रिसॉर्ट, मॉल, बाजार बंद राहतील.
  • रेस्टॉरंट, ऑनलाईन खाद्यपदार्थ यांची घरपोच सेवा १७ ते २२ जुलैपर्यंत पूर्ण बंद राहतील. २२-२६ जुलैपर्यंत पुन्हा घरपोच सेवा सुरू राहील.
  • वाईन शॉप, देशी दारूची दुकाने, मद्याची घरपोच सेवा या बाबी १७ ते २२ जुलै पर्यंत पूर्णतः बंद राहतील.
  • उद्याने, क्रीडांगणे बंद राहतील.
  • मटण, चिकन यांची विक्री १७-२२ पूर्ण बंद राहील. २२-२६ सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत विक्री सुरू राहील.
  • शाळा, महाविद्यालये पूर्ण बंद राहतील.
  • स्पा, सलून बंद राहणार.
  • खासगी बांधकाम बंद राहणार.
  • धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम यांना मुभा दिली नाही.
  • दूध विक्री आणि घरपोच दूध सेवा सकाळी ६ ते १० या वेळेत सुरू राहील.
  • गॅस सेवा, रेशन दुकाने सुरू राहतील.
  • मेडिकल, रुग्णालय, अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button