breaking-newsताज्या घडामोडी

#CoronaVirus: सोलापुरात दोन कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू; आढळले सात नवे रूग्ण

सोलापुरात सोमवारी दोन करोनाबाधित महिलांचा मृत्यू झाला, तर सात नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे करोनाबाधित रूग्णसंख्या १३५ वर पोहोचली असून मृतांची संख्या आठवर गेली आहे. दरम्यान, रूग्णालयात यशस्वी उपचार झाल्यानंतर करोनावर मात करीत २२ रूग्णांना घरी पाठविण्यात आले आहे. सध्या रूग्णालयात १०५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

मोहोळ तालुक्यातील पाटकूल येथे राहणाऱ्या एका २६ वर्षाच्या बाळंतीण महिलेला करोनाची बाधा झाल्यामुळे तिला छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. दुसरी मृत महिला ६५ वर्षांची वृध्द असून तिला काल रविवारी दुपारी रूग्णालयात दाखल केले असता अवघ्या तासातच तिचा मृत्यू झाला. तत्पूर्वी, तिची करोना चाचणी घेण्यात आली होती. यात तिला करोनाची बाधा झाल्याचे सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालावरून स्पष्ट झाले. त्यामुळे आतापर्यंत मृतांची संख्या आठ झाली असून यात पाच महिला व तीन पुरूषांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button