breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#CoronaVirus : ‘वायसीएम’मधील त्या तीनजणांची प्रकृती स्थिर

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आजपर्यंत एकुण १५ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आलेले आहेत. यामधील ०१ रुग्णाचा १४ दिवसाचा कालावधी पुर्ण झाल्यामुळे २४ तासातील घशातील द्रव्याचे लागोपाठ दोन नमुन्याचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्याला घरी सोडण्यात आले असून त्याला घरामध्ये १४ दिवस अलगीकरणामध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

रुग्णालयात दाखल असणा-या ३ रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांचेवर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरु आहेत. तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे घरात विलगीकरणात असणाऱ्या नागरिकांची आजपर्यंतची संख्या १७१८ असून त्या सर्वांनी किमान १४ दिवसासाठी व आवश्यकता भासल्यास पुढील २८ दिवसांपर्यत घरातच थांबण्याच्या सूचनांचे पालन करावे.

तसेच, सुचनांचे पालन न करणाऱ्या होम क्वारंटाईनमधील नागरिकांवर कायद्यानसार कारवाई करण्यात येणार असून सूचनांचे उल्लंघन करणा-या नागरिकांना पोलिसांमार्फत ताब्यात घेवन पढील १४ दिवसांपर्यत संस्थात्मक अलगीकरण (क्वारंटाईनची) व्यवस्था केलेल्या ठिकाणी राहावे लागेल. या आदेशाचे उल्लघन करणा-यांना कायद्यानुसार सहा महिन्यांपर्यंत शिक्षेची तरतुद असून नागरिकांनी सर्व सुचनांचे पालन करावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व पक्ष नेते नामदेव ढाके यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button