breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोरोनामुळे नागरिकांना महापालिका देणार घरपोच सेवा

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे. या साथ रोगाचा संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांना घराबाहेर पडू नये अशा सूचना विविध माध्यमांतून देण्यात येत आहे.

सध्या लॉकडाऊनची परिस्थिती असल्याने, नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी शासन स्तरावर आणि महापालिका स्तरावर स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने नियोजन करण्यात आलेले आहे. घराबाहेर जाणे शक्य नसलेले ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्ती यांना अन्न, औषधे व इतर सेवा सुविधांची आवश्यकता असल्यास, त्याकरीता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सारथी हेल्प लाईन मोबाईल क्रमांक 8888006666 संपर्कासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. घराबाहेर जावू न शकणारे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्ती यांनी घरपोहोच औषधे उपलब्ध करून देण्याच्या सेवेचा लाभ घेणेकामी मनपा सारथी हेल्प लाईन मोबाईल क्रमांक 8888006666 वर संपर्क साधावा.

तसेच याकामी महापालिकेस प्रत्येक प्रभाग क्षेत्रामध्ये घरपोहोच औषधे उपलब्ध करून देण्याकरीता पिंपरी चिंचवड केमिस्ट असोशिएशनने तयारी दर्शविली असून प्रभाग निहाय औषध विक्रेत्यांची नावे व फोन क्रमांक खालीलप्रमाणे आहेत. घराबाहेर पडू न शकनारे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्ती यांना प्रामुख्याने ही सेवा उपयुक्त ठरू शकेल.

औषध विक्रेत्यांना दिलेल्या क्रमांकावर फोन केल्यास आवश्यक औषधांचे प्रत्यक्ष शुल्क आकारून घरपोहच औषधे उपलब्ध करून देण्यात येतील. घरपोहोच औषध उपलब्ध करून देण्याकरीता अतिरिक्त सेवा शुल्क आकारण्यात येणार नाही. याकामी पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष खिंवसरा यांनी पुढाकार घेतला असून, नागरिकांना काही अडचण आल्यास त्यांना महेश खिंवसरा मोबाईल क्रमांक 9860718185 वर संपर्क साधावा . तसेच ही सेवा महापालिकेच्या सारथी हेल्पलाईन क्रमांक 8888006666 या क्रमांकावर देखील २४ तास उपलब्ध राहील . या सेवेचा लाभ घराबाहेर जाणे शक्य नसलेले ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्ती यांनी घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे .

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button