breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus |मागील २४ तासांत मुंबईत कोरोनाचे ५२ नवे रुग्ण
मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबईत ही कोरोना रुग्ण वाढत आहेत. मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 52 रुग्ण वाढले आहेत. तर मुंबईत कोरोनो रुग्णांची संख्या 330 वर पोहचली आहे.
गेल्या 24 तासांत 4 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण 22 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या धारावीमध्ये कोरोनाग्रस्त आढळून आल्याने ही मुंबईसाठी मोठी धोक्याची घंटा मानली जात आहे. आतापर्यंत धारावीमध्ये 4 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.