breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

…तर ठाकरे सरकार कोसळेल; सचिन वाझेंच्या अटकेनंतर कंगनाचं ट्विट

मुंबई |

मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएने अंबानी स्फोटकं प्रकरणात अटक केली. या अटकेनंतर राज्यात खळबळ उडाली. स्फोटकं असलेली स्कॉर्पिओ अंबानींच्या घराजवळ पार्क करण्याच्या घटनेत वाझे यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. या प्रकरणावरून अभिनेत्री कंगना रणौतने ठाकरे सरकारवर टीका केली आहे. शनिवारी रात्रीपर्यंत चौकशी केल्यानंतर एनआयएने सचिन वाझे यांना अटक केली आहे.

हे वृत्त समोर आल्यानंतर भाजपाकडून सरकारवर टीका होत आहे. त्यातच आता अभिनेत्री कंगना रणौतनंही ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “या प्रकरणात एक मोठं कटकारस्थान शिजत असल्याचं मला दिसतंय. शिवसेना सत्तेत आल्यानंतर या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं होतं. त्याला परत सेवेत घेण्यात आलं. याचा जर योग्य तपास केला तर केवळ या प्रकरणातील रहस्यचं बाहेर येणार नाही, तर राज्यातील सरकार कोसळेल. त्याचवेळी माझ्यावर २०० पेक्षा जास्त गुन्हे दाखल होतील असं माझं मन सांगत आहे. जय हिंद,”असं कंगनानं म्हटलं आहे.

वाचा – वनमंत्री पदासाठी शिवसेना नगरसेवकाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button