breaking-newsपिंपरी / चिंचवड

‘मी माझ्या घरात लाईट चालू ठेवणार, एकही दिवा पेटवणार नाही’; मोदींचा उपदेश म्हणजे निव्वळ बालीशपण

– राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संदीप काटे यांनी केला जाहीर निषेध

पिंपरी | महाईन्यूज| प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांकडे ९ मिनिटांचा वेळ मागितला असून ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता आपल्या घराबाहेर दिवा पेटवण्याचं बाष्फळ आवाहन केलं आहे. देशावर कोरोनाचे भयंकर संकट असताना मोदींकडून आशादायक चित्र अपेक्षित आहे. मात्र, मोदींनी असा उपदेश केल्याने त्यांच्यावर देशभरातून टिकाटिपन्नी होत आहे. पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संदीप काटे यांनी मोदींच्या या विधानाचा जाहीर निषेध केला आहे. ‘मी माझ्या घरातील लाईट चालू ठेवणार आणि एकही दिवा पेटवणार नाही. कारण मी मूर्ख नाही’, अशा शब्दांत काटे यांनी मोदींच्या आवाहनाला केराची टोपली दाखवली आहे.

याबाबत बोलताना संदीप काटे म्हणाले की, ‘भारताने कोरोना विषाणुवर मात करण्यासाठी उपायकारक लस शोधणे अपेक्षित आहे. या विषाणुविरूद्ध लढा देणारे डॉक्टर्स, नर्स, कंपाऊंडर, रुग्णालयातील अन्य स्टाफ यांना सुरक्षिततेसाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे दिली जात नाहीत. एन – १९ मास्कचा तुटवडा भासत आहे. दर्जेदार हेंडग्लोज दिले जात नाही. सेनिटाजर उपलब्ध नाहीत. कोरोनाचे अघोषित युध्द जिंकण्यासाठी पोलीस यंत्रणा, आरोग्य, वैद्यकीय विभागाशी निगडीत कर्मचा-यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याची ही वेळ आहे. अशा परिस्थितीत मोदींनी अशा पध्दतीचा उपदेश करणे म्हणजे निव्वळ बालिशपणाचे आहे. त्यांच्या या विधानाला कसलाही तांत्रिक आधार नाही. नागरिकांना वेड्यात काढण्याचा हा प्रकार आहे, असे काटे यांनी म्हटले आहे.

याच प्रश्नावर सध्या देशामधील वीजनिर्मिती करणाऱ्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी आणि इंजिनियर्स व खुद्द महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही प्रकाशझोत टाकला आहे. अशाप्रकारे एकाच वेळेस लाईट बंद केल्यास ट्रिप होऊन सेंट्रल ग्रीड निकामी होईल आणि राज्यासहीत संपूर्ण देश अंधारात जाईल, अशी भिती व्यक्त केली आहे. “हे म्हणजे गाडी वेगाने सुरु असतानाच ब्रेक लावण्यासारखं किंवा अचानक एक्सेलेटर देण्यासारखं आहे. अशान संपूर्ण देशाला वीज पुरवठा करणाऱ्या नेशनल पावर ग्रीडला धोका पोहचून ती बंद पडण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना केलेल्या आवाहनास प्रतिसाद न देता, ‘मी माझ्या घरातील लाईट चालू ठेवणार आणि एकही दिवा पेटवणार नाही, कारण मी मूर्ख नाही’, अशा शब्दांत उर्जामंत्री राऊत यांनी मोदींच्या उपदेशाचा निषेध केला आहे.

नागरिकांनो हा मंत्र अंगीकारा

शहरातील नागरिकांनी देखील या आवाहनास प्रतिसाद न देता, अंधश्रद्धा न बाळगता, उद्या रविवारी रात्री ९ वाजता आपली वीज बंद करू नये, अशाने आपणच आपल्या देशातल्या वीज यंत्रणेस बाधित करू शकतो. त्यामुळे तुम्हीही ‘मी माझ्या घरातील लाईट चालू ठेवणार आणि एकही दिवा पेटवणार नाही’ हा मंत्र अंगीकारत व घरात राहूनच कोरोनाशी मुकाबला करा, असे आवाहन संदीप काटे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button